Whats new

‘संत नामदेव पुरस्कार 2015’ पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह यांना जाहीर

सरहद संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘संत नामदेव पुरस्कार 2015’ पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांना जाहीर झाला आहे. १० जुन रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी ही माहिती दिली. १ लाख १ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

संत नामदेव यांची पंजाबातील कर्मभूमी घुमान येथे यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. तसेच या संमेलनाच्या आयोजनात बादल यांनी सिंहाचा वाट उचलला. तसेच पंजाबला दहशतवादाच्या आगीतून बाहेर काढण्यामध्येही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. या कार्याचा गौरव म्हणून बादल यांना संत नामदेव पुरस्कार दिला जाणार आहे, असे नहार म्हणाले. यापूर्वी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यश चोप्रा, साहित्यिक जतींदर पन्नू, ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर, मोन्टेकसिंग अहलुवालिया यांना ‘संत नामदेव' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.