Whats new

वॉवरिन्का नवा ‘क्ले किंग’ फ्रेंच ग्रँड स्लॅम

 

स्टॅनिसलॉस वॉवरिन्का या स्विस खेळाडूने ४-६, ६-४, ६-३, ६-४ असा विजय मिळवत  प्रथमच ही स्पर्धा जिंकली.

ग्रँड स्लॅम स्पर्धेत त्याचे हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते. जोकोव्हिचने कारकिर्दीत आतापर्यंत आठ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत, मात्र फ्रेंच स्पर्धेत याआधी दोन वेळा अंतिम फेरीत स्थान मिळूनही अजिंक्यपदापासून तो वंचित राहिला होता.

जोकोव्हिचने अंतिम फेरीत स्थान मिळवण्यापूर्वी राफेल नदाल व अँडी मरे या तुल्यबळ खेळाडूंवर मात केली होती, तर वॉवरिन्काने माजी विजेत्या रॉजर फेडररला हरवले होते.

ग्रँड स्लॅम ०२

२०१४  ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा  

२०१५  फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा

स्टॅनिसलॉस वॉवरिन्काने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याने रविवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावून कारकिर्दीतले दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.

महिला एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणाऱ्या ल्युसी साफारोव्हाने दुहेरीत जेतेपदाला गवसणी घालताना पहिले ग्रँड स्लॅम जिंकेले महिला दुहेरीत बी. मॅटेक सँड आणि साफारोव्हा यांनी बाजी मारली. सँड-साफारोव्हा या ७ व्या मानांकित जोडीने पहिला सेट गमावल्यानंतरही या जोडीने दमदार खेळाचा नजराणा सादर केला. या दोघींनी आक्रमक खेळ करताना कॅसी डेल्लाक्युआ आणि यारोस्लावा श्वेदोव्हा यांच्यावर ३-६, ६-४, ६-२ असा विजय मिळवला.

< < Prev Next >>