Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

टिंटू लुकाचे सोनेरी यश

 

ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू पी. टी. उषा यांची शिष्या टिंटू लुका हिने आठशे मीटर धावण्याची शर्यत जिंकून वरिष्ठ आशियाई मैदानी स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. तिने मिळविलेल्या सुवर्णपदकांसह भारताने चार सुवर्ण, पाच रौप्य व चार कांस्यपदके अशी एकूण तेरा पदके मिळवीत पदकतालिकेत तिसरे स्थान मिळविले.

टिंटू हिने आठशे मीटरचे अंतर दोन मिनिटे १.५३ सेकंदात पार केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. टिंटू या २६ वर्षीय खेळाडूने कारकीर्दीतील वैयक्तिक शर्यतीत पहिलेच विजेतेपद मिळविले आहे. तिने २०१३ व २०१४ मध्ये चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता . चीन संघाने १५ सुवर्ण, तेरा रौप्य व तेरा कांस्य अशी एकूण ४१ पदके मिळवीत प्रथम स्थान मिळविले. कतारने सात सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य अशी एकूण दहा पदके मिळवीत दुसरा क्रमांक पटकाविला.

पुरुषांच्या विभागात भारताच्या जिन्सान जॉन्सन याने रौप्यपदक मिळविताना एक मिनिट ४९.६९ सेकंद वेळ नोंदविली. गतवेळचा विजेता मुसाब बाला (एक मिनिट ४९.४० सेकंद) या कतारच्या खेळाडूने या शर्यतीत विजेतेपद राखले. पुरुषांच्याच दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत धरमबीरसिंग याने कांस्यपदक मिळविले. त्याने हे अंतर २०.६६ सेकंदात पार केले व अनिलकुमार याने पंधरा वर्षांपूर्वी नोंदविलेला २०.७३ सेकंद हा राष्ट्रीय विक्रम मोडला. 

< < Prev Next >>