Whats new

प्रभात रंजन यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

राज्य सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रभात रंजन यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी निवड केली आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद यांनी राजीनाम दिल्यानंतर हे पद रिक्तच होते. त्या जागी आता १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी प्रभात रंजन यांची नियुक्ती झाली आहे. रंजन हे सध्या कुलाबा येथील राज्य राखीव पोलीस मुख्यालयात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. रंजन यांच्या नियुक्ती बरोबरच राज्य सरकारने के. प्रसाद यांचा राजीनामा मंजूर केला आहे.