Whats new

भारत सरकारची महत्त्वाकांक्षी ‘भारत-माला’ योजना

 

देशाच्या पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत म्हणजे मिझोरामपासून ते गुजराथच्या सीमाभागापर्यंत रस्ता बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना भारत सरकारने आखली असून या योजनेला भारतमाला असे नांव दिले गेले आहे. या योजनेसाठी १४ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पर्यावरण मंजुरी आणि भूमी अधिग्रहणानंतर या वर्षातच ही योजना सुरू केली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत ५३०० किमीचा नवीन रस्ता बांधला जाणार आहे. हा रस्ता प.बंगाल, महाराष्ट्र व किनारपट्टीवरील राज्यांना एका रोड नेटवर्कने जोडला जाणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले गेले असून त्याची सुरवात राजस्थान व गुजराथपासून केली जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, व त्यानंतरच्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार तराई क्षेत्र, सिक्कीम, आसाम व अरूणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम ते भारत म्यानमार सीमेपर्यंतचे काम पूर्ण केले जाणार आहे.

यामुळे सीमा भागात चांगली कनेक्टीव्हीटी उपलब्ध होणार असून त्याचा फायदा लष्करी वाहतूक, सीमा व्यापार वाढ, पहाडी राज्यातील आर्थिक उलाढाली वाढण्यास हातभार लागण्यास होणार आहे. या मुळे पहाडी राज्यांकडे अधिक लक्ष पुरविणेही शक्य होणार आहे. या योजनेप्रमाणेच सागरमाला नावाची योजनाही सरकारच्या विचाराधीन असून त्यात बंदरे व किनारपट्टीवरील प्रदेश रेल्वे आणि रस्त्यांच्या जाळ्यांनी देशाच्या अंतर्गत भागांशी जोडण्यात येणार आहेत.

< < Prev Next >>