Whats new

कॅनेडियन शर्यतीत हॅमिल्टन विजेता

मर्सिडीजच्या विश्‍वविजेत्या लुईस हॅमिल्टन याने जागतिक फॉर्म्युला वन मालिकेतील कॅनेडियन ग्रांप्री शर्यतीत वर्चस्व राखत विजय मिळविला. हॅमिल्टनने सहकारी निको रॉस्बर्ग याचे आव्हान मोडून काढले. विल्यम्सच्या व्हॅल्टेरी बोट्टासने फेरारीच्या किमी रैक्कोनन याच्यापेक्षा सरस कामगिरी करीत तिसरा क्रमांक पटकावला.
पहिल्या 'पीट-स्टॉप'नंतर हॅमिल्टनला झुंज देण्याचा प्रयत्न रॉस्बर्गने केला, पण तो अपयशी ठरला.  हॅमिल्टनने पात्रता फेरीत सर्वोत्तम कामगिरी करून 'पोल पोझिशन' मिळविली होती.
याआधी मोनॅकोतील शर्यतीत हॅमिल्टनने पहिला क्रमांक गमावला होता. या वेळी मात्र त्याने वेगवान सुरवात करीत पहिल्याच कॉर्नरला आघाडी घेतली'पीट-स्टॉप'पर्यंत त्याने चार सेकंदांनी वर्चस्व मिळविले होते. उर्वरित शर्यतीत त्याने एका सेकंदापेक्षा जास्त वेळेने आघाडी राखली. हॅमिल्टनचा सात शर्यतींमधील हा चौथा विजय आहे.