Whats new

"युनितार'च्या प्रमुखपदी निखिल सेठ यांची नियुक्ती

संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (युनितार)च्या प्रमुख पदावर निखील सेठ या वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकार्याची निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस बान की मून यांनी त्यांची या संस्थेच्या कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती केली आहे. हे सध्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागाचे संचालक आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ३५ वर्षे नागरी सेवेचा अनुभव आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी जगभरात राबविल्या जाणाऱ्या विविध विकास आणि संशोधन कार्यक्रमांद्वारे जवळपास 25 हजार जणांना लाभ होतो.