Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत भारताचा धोनी

 

फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या जगभरातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंच्या यादीत भारताच्या फक्त महेंद्रसिंह धोनीचे नाव आहे.

 

फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वांत श्रीमंत शंभर खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या यादीत अमेरिकेचा मुष्टियोद्धा फ्लॉइड मेवेदर हा अव्वल स्थानावर आहे. याबरोबरच गोल्फपटू टायगर वुड्स, स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर, पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या दहा खेळाडूंमध्ये आहेत. मेवेदर याची यंदाची कमाई 300 मिलियन डॉलर इतकी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्याच्या कमाईत दुपट्टीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा मेवेदरला सर्वांत श्रीमंत खेळाडू घोषित करण्यात आले आहे. सर्बियाचा नोव्हाक जोकोविच (13), सेबॅस्टियन व्हेटेल (21), रॅफेल नदाल (22) आणि वॅन रुनी (34) आणि उसेन बोल्ट (73) या प्रमुख खेळाडूंना यादीत स्थान देण्यात आले आहे.

 

भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी 23 व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी तो 22 व्या स्थानावर होता. धोनीची एकूण संपत्ती 31 मिलियन डॉलर (198 कोटी रुपये) एवढी आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, सध्या तो एकदिवसीय संघाचे कर्णधारपद भूषवित आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने अंतिम फेरी गाठली होती. धोनीच्या या सर्व कमाईचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे