Whats new

मुंबई विद्यापीठ आशियात १२५ वे!

 

आशिया खंडातील विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाने यंदा १२५व्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठ १३१व्या स्थानावर होते. देशभरातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाने दुसऱ्या स्थानावर नाव कोरले असून राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. क्वाकारेली सायमंड (QS) तर्फे दरवर्षी आशियातील सर्वोत्तम विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात येते. मुंबई विद्यापीठाने क्रमवारीत ४६.३ गुण मिळवल्याचे क्यूएसच्या अहवालात बुधवारी स्पष्ट झाले. 
या अहवालात मुंबई विद्यापीठाबरोबरच आयआयटी बेंगळुरू(३४), तर आयआयटी दिल्ली(४२) आणि आयआयटी मुंबईचा (४६) समावेश आहे. 
त्यानुसार शैक्षणिक वर्षे २०१४-१५ च्या शैक्षणिक वर्षासाठीची ही यादी वेबसाइटवर जाहीर केली आहे. पारंपारिक विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाने दुसरा तर दिल्ली विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे, या अहवालात पहिल्या पन्नासांत आयआयटी बेंगळुरू, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबईचा समावेश आहे. तर पहिल्या शंभरात आयआयटी खरगपूर ६७व्या स्थानावर, दिल्ली विद्यापीठ ९१व्या स्थानावर आणि आयआयटी गुवाहाटी ९८व्या स्थानावर असल्याचे दिसून आले आहे.