Whats new

भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव पुरस्कारमनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या उपक्रमशील संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा गुणिजन परिवार जीवनगौरव पुरस्कार यंदा गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, दादर, मुंबई येथे १३ जून रोजी आयोजित अखिल भारतीय गुणिजन गौरव संमेलन २०१५ या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या गझलर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र आणि ५000 रुपये असे आहे. या अखिल भारतीय गुणिजन गौरव संमेलनात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील लौकिकप्राप्त गुणवंत व्यक्तींचा राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप प्रतिभार पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. नामवंत पत्रकार, साहित्यिक, समाजसेवक यांच्या उपस्थितीत हा समारंभ गुणिजन संमेलनाच्या समारोप सोहळ्यात संपन्न होईल.