Whats new

अमेरिका सर्वात मोठा खनिज तेल उत्पादक देश

 

सौदी अरेबियाला मागे टाकत अमेरिका जगातील सर्वात मोठा कच्चे तेल (क्रूड ऑईल) उत्पादक देश बनला आहे, तर भारत तमाम मोठय़ा अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात वेगाने विजेचा वापर करणारा देश बनला आहे. मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. तेल कंपनी बीपीच्या ऊर्जा रिपोर्टच्या मते, अमेरिकेने २०१४ मध्ये दररोज १.१६ कोटी बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन केले आहे. या काळात सौदी अरेबियाचे दैनिक उत्पादन १.१५ कोटी बॅरल राहिले होते. तिसर्‍या नंबरवर रशियाने दररोज १.०८ कोटी बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन घेतले आहे. बीपीच्या मते चीन १९९८च्या नंतर वापरात सर्वात खालच्या पातळीवर आहे. ऊर्जा वापराच्या बाबतीत भारताने ७.१ टक्केची वाढ दर्शवली आहे. ही वाढ मोठय़ा अर्थव्यवस्थेमध्ये अल्जेरियानंतर सर्वात वेगाने होणारी आहे. तथापि भारताच्या तेल उत्पादनात १.३ टक्क्यांनी घट आलेली आहे.