Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

तुळशीदास बोरकर, कामत यांच्यासह ३६ जणांना संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार

 

संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशिप आणि पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जेष्ठ हार्मोनियम वादक आणि संगीतकार तुळशीदास बोरकर यांना प्रतिष्ठित अशी संगीत नाटक अकादमीची फेलोशिप देण्यात आली असून, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते रामदास कामत, गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, बासरी वादक रोणू मुझुमदार अशा ३६ जणांना अकादमीचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत.
संगीत नाटक अकादमीच्या कार्यकारी समितीने सन २०१४ साठीचे हे पुरस्कार जाहीर केले आहेत. फेलोशिप आणि पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांना अनुक्रमे तीन लाख आणि एक लाख रुपये रोख देऊन गौरवण्यात येते. त्याशिवाय, लोकसंगीत आणि बोलक्या बाहुल्यांच्या खेळातील योगदानासाठी आठ कलाकारांना गौरवण्यात आले आहे. 
संगीतः अश्विनी भिडे देशपांडे (गायन), नाथ नेर्लेकर, इक्बाल अहमद खान, रोणू मुझुमदार, नयन घोष, प्रसाद राव (व्हायोलीन), सुकन्या रामगोपाल, द्वारम दुर्गा 
नृत्यकलाः अदयार जनार्दनन (भरतनाट्यम), उमा डोग्रा (कथक), अमुसना देवी (मणिपुरी), वेदांतम राधेश्याम (कुचिपुडी), सुधाकर साहू (ओडिसी) 
नाटकः रामदास कामत, असगर वजाहत, सूर्यमोहन कुलश्रेष्ठ, चिदंबर राव जांबे, देवशंकर हलदार, अमोद भट्ट, मंजुनाथ भागवत हस्टोटा, अमरदास माणिकपुरी.