Whats new

दुरांतोच्या धर्तीवर सुविधा गाड्या

 

सध्याच्या दुरांतो रेल्वे गाड्यांच्या धर्तीवरच अतिजलद अशा रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने केला आहे. या गाड्यांचे स्वरूप पूर्णपणे व्यापारी व सवलतरहित असेल म्हणजेच जेष्ठ नागरिक किंवा भाड्यात सवलतीसाठी पत्र असलेल्यांना या गाड्यांमध्ये त्या सवलतीचा लाभ मिळणार नाही. पूर्ण भाडे चुकते करूनच या गाड्यांनी प्रवास करता येणार आहे. गाड्यांसाठी केवळ “कन्फर्म” आणि “"आरएसी तिकिटेच जारी केली जातील. या गाड्यांना प्रतीक्षा यादी नसेल. १ जुलै पासून या रेल्वे गाड्या सुरु केल्या जातील.