Whats new

वेस्ली हॉल यांना “हॉल ऑफ फेम”

 

वेस्ट इंडीजचा एक काळ गाजविलेले वेगवान गोलंदाज वेस्ली हॉल यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) चा “हॉल ऑफ फेम” सन्मान प्रदान करण्यात आला. हा मान मिळालेले ते वेस्ट इंडीजचे  18वे आणि एकूण 80वे क्रिकेटपटू आहे. क्रिकेटमधली अमूल्य कामगिरी आणि योगदानसाठी हा सन्मान दिला जातो. सबिना पार्क मैदानावर देशबांधव कोर्टनी वॉल्श यांच्या हस्ते त्यांना मनाची ‘कॅप’ प्रदान करण्यात आली.  या प्रसंगी “आयसीसी”चे संचालक आणि वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष डेव्ह कॅमेरॉन, क्‍लाईव्ह लॉईड, एव्हर्टन विक्‍स आदी उपस्थित होते.  यंदा यापूर्वी बेट्टी विल्सन, अनिल कुंबळे, मार्टिन क्रो यांना या किताबाने गौरविण्यात आले आहे.  हॉल म्हणाले की, "मी फार भारावून गेलो आहे. हा किताब मिळालेल्या खेळाडूंची यादी मी पहिली आहे. आज खेळाने जी उंची गाठली आहे,  त्यात यातील काही जणांचा लक्षणीय वाटा आहे.  त्यांच्या पंक्तीत विराजमान होणे हा मोठाच  बहुमान आहे.  हॉल यांनी 48 कसोटींमध्ये 192 विकेट घेतल्या.