Whats new

श्रीनिवासन सलग १४व्यांदा टीएनसीएच्या अध्यक्षपदी

 

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन हे तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या(टीएनसीए)अध्यक्षपदी सलग १४ व्यांदा निर्वाचित झाले. संघटनेची ८९ वी आमसभा पार पडली त्यात श्रीनिवासन यांना एका वर्षासाठी अध्यक्ष निवडण्यात आले.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव आल्यानंतर श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदी कायम राहण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली होती. त्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा या पदावर येण्याच्या शर्यतीतूनही माघार घ्यावी लागली.

टीएनसीएचे सध्याचे सचिव काशी विश्वनाथन हे आगामी कार्यकाळासाठी देखील सचिवपदी कायम राहणार आहेत. व्ही. व्ही. नरसिम्हन यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली. श्रीनिवासन हे २००२-०३ पासून संघटनेचे अध्यक्ष आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष ए. सी. मुथय्या यांचा पराभव करीत ते पदावर आले होते.