Whats new

10 रूपयाच्या नव्या नोटेवरून राष्ट्रपिता गायब

 

भारतीय रिझर्व्ह बँकेने दहा रूपयाच्या नव्या नोटावरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो हटवला आहे. त्यामुळे जवळपास 19 वर्षानंतर गांधी यांचा 10 रूपयाच्या नोटाशी असलेला संबंध तुटला आहे. आरबीआयने पहिल्या टप्यात जारी केलेल्या दहा रूपयांच्या काही नव्या नोटा चलनात आणल्या आहेत.

1996 मध्ये प्रसिद्ध झालेल्या दहा रूपयाच्या नोटावर महात्मा गांधी यांचा फोटो आणि नाव होते. आता आरबीआयने या नोटेवरून त्यांचे नाव आणि फोटो दोन्ही हटवले आहेत. आरबीआय आता लवकरच नवे गव्हर्नर रघुराम राजन यांचे हस्ताक्षर असणारी १० रुपयांची नोट बाजारात आणणार आहे.