Whats new

भारत, ऑस्ट्रेलिया करणार संयुक्त नौदल सराव

 

भारत व ऑस्ट्रेलियाने प्रथमच संयुक्त नौदल सराव करण्याचा निर्णय घेतला असून या वर्षाच्या अखेरीस हा सराव होण्याची शक्‍यता आहे. याचबरोबर, या सरावामध्ये जपानही सहभागी होण्याची शक्‍यता आहे. आशियामधील चीनच्या वाढत्या आक्रमक धोरणाच्या पार्श्वभूमीवर हा संयुक्त नौदल सराव अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. 

भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाने इतर क्षेत्रांमधील सहकार्याबरोबरच सागरी सुरक्षेसंदर्भातील सहकार्य अधिक सुदृढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन देशांमध्ये गेल्या आठवड्यात प्रथमच एकत्रित चर्चा झाली. भारतातर्फे या चर्चे मध्ये एस. जयशंकर हे सहभागी झाले होते. यावेळी सागरी सुरक्षेसहित, दक्षिण चीनी समुद्रामधील तणावपूर्ण परिस्थिती, हिंदी आणि प्रशांत महासागरांमधील सहकार्यासंदर्भात प्रामुख्याने चर्चा झाली. या चर्चा अखेरीस भारत व ऑस्ट्रेलिया यांनी संयुक्त सराव करण्याचा निर्णय घेण्यात आला.