Whats new

महाराष्ट्राच्या सुरज कोकाटेला आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्ण

 

दिल्लीत सुरु असलेल्या आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुरज कोकाटे याने मुंबईची मान उंचावली आहे. आशियाई कॅडेट कुस्ती फ्री स्टाईल प्रकारात ६३ किलो वजनी गटात महाराष्ट्राचा मल्ल सुरज उर्फ नामदेव कोकाटे याने सुवर्णपदक पटकावले आहे.
सुरजनं या स्पर्धेत इराण, कझाकस्तान आणि मंगोलियाच्या मल्लांना नमवत त्याने अंतिम फेरीत मजल मारली होती.   त्यानंतर अंतिम सामन्यात त्याने ताजिकिस्तानच्या अबुबाकारी जमशेदला १२-२ असे लोळवले. सुरज हा पुणे जिल्हयातील इंदापूर तालुक्यातील सराटी गावचा असून तो गेली पाच वर्षे कात्रजच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात अर्जूनवीर काका पवार आणि आंतरराष्ट्रीय मल्ल गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.