Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

अणू ऊर्जा प्रकल्पांसाठी १५०० कोटींचा विमा

 

अणू ऊर्जा प्रकल्पांचे संचालन करताना अपघात झाल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची जबाबदारी त्या प्रकल्पाची यंत्रसामुग्री पुरविणाऱ्या परकीय पुरवठादारावर पडू नये यासाठी भारत सरकारने शनिवरी १,५०० कोटी रुपयांचा विमानिधी (इन्श्युरन्स पूल) स्थापन केला.अशा प्रकारे ‘सिव्हिल लायएबिलिटी फॉर न्युक्लियर डॅमेज अ‍ॅक्ट’ (सीएलएनडी)  या कायद्याची पूर्तता करण्यात आली आहे. देशातील सर्व अणूऊर्जा प्रकल्पांचा देशातच पूर्णांशाने विमा उतरविण्याची सोय यामुळे झाली आहे. या  विमा निधीत काही परकीय कंपन्यांनी पैसे घातले असले तरी त्यामुळे परकीय निरीक्षकांना भारतीय अणू प्रकल्पांची तपासणी करण्याचा अधिकार मात्र मिळणार नाही.