Whats new

केंद्र सरकार तर्फे मनरेगा अंतर्गत कामाचे दिवस १०० करून १५० करण्याची घोषणा

 

मान्सून पावसाळा कमजोर असल्याचे भाकीत विविध हवामान संस्था तसेच इतर देशातील हवामान विभागामार्फत केल्यामुळे भारत सरकारने दुष्काळ निवारण्यासाठी काही उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

मनरेगा अंतर्गत येणारा कामाचे दिवस आधी १०० होते तर आता १५० दिवसांची काम मिळवण्याची गॅरंटी सरकारची असेल अशी घोषणा केंद्र सरकार तर्फे नुकतीच करण्यात आली. ही योजना दुष्काळ ग्रस्त भागात त्वरित राभवण्यावर भर दिला जाईल. असे केंद्रीय ग्रामीण विकास आणि पेयजल मंत्री वीरेंद्र सिंह यांनी सांगितले.