Whats new

जयंत सावरकर, सुलभा देशपांडे यांना 'जीवनगौरव'

 

ज्या दिग्गजांनी मला घडवले आणि मोठे केले त्यांच्या पुण्याईमुळेच मला आज हे स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे आजचा माझा जीवन गौरव पुरस्कार मी त्या सगळय़ांना अर्पण करतो, असे मनोगत अभिनेते जयंत सावरकर यांनी व्यक्त केले.
आद्य नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदे'तर्फे यशवंत नाटय़ मंदिर येथे झालेल्या  'रंगभूमी दिन' कार्यक्रमात सावरकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना 'जीवन गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.  यांना विक्रम गोखले आणि उदय सामंत तर सुलभा देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षा फैय्याज, ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू, नाटय़ परिषदेच्या कोषाध्यक्षा लता नार्वेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.  प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या दोघांनाही आपल्याला मिळालेल्या पुरस्काराची रक्कम नाटय़ परिषदेच्या वृद्ध कलावंतांसाठी असलेल्या निवृत्त वेतन योजनेसाठी देणगी म्हणून दिली.