Whats new

तेजस्विनी सागर बनली तिहेरी मुकुटाची मानकरी

 

 सिंगापूर येथे झालेल्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादच्या तेजस्विनी सागरने दमदार कामगिरी केली. वीस वर्षांखालील मुलींच्या गटात वैयक्तिक आणि संघ कामगिरीत रौप्य आणि वूमन इंटरनॅशनल मास्टरची आदर्श ठरल्याने तेजस्विनी तिहेरी मुकुटाची मानकरी ठरली.

वर्ल्ड स्कूल आणि एशियन स्कूलचे सुवर्णपदक मिळविल्याने तेजस्विनीचा आत्मविश्‍वास चांगलाच वाढला आहे. ती 15 वर्षांआतील गटाची आहे. तिला 16 आणि 18 वर्षे वयोगटात खेळता आले असते; मात्र मागील काही स्पर्धांतील यशाने तिने 20 वर्षांआतील गटात खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे दोन इंटरनॅशनल वूमन मास्टरशी खेळण्याची संधी मिळाल्याचे तेजस्विनी सांगते.