Whats new

अण्वस्त्र वाहकाची चीनकडून यशस्वी चाचणी

 

स्वनातीत अण्वस्त्र प्रक्षेपण वाहन चीनने तयार केले असून त्याची चौथी चाचणी यशस्वी झाली आहे, या वृत्ताला संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. दक्षिण चीन सागरी प्रदेशात त्यामुळे आणखी तणाव निर्माण होण्याची भीती अमेरिकेने बोलून दाखवली आहे.डब्ल्यूयू १४ असे या स्वनातीत अण्वस्त्रवाहक वाहनाचे नाव असून त्याची चाचणी करण्यात आली आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी ने गेल्या १४ महिन्यात घेतलेली ही चौथी चाचणी होती.

लष्करी निरीक्षकांच्या मते, बीजिंग ज्या वेगाने चाचण्या घेत आहे त्या बघता चीनच्या अमेरिकेबरोबरच्या प्रादेशिक भांडणाशी त्याचा संबंध आहे व त्या भागात धाक जमवण्यासाठी चीन त्याचा वापर करील.