Whats new

जेम्स अँडरसनला ‘ओबीई’ पुरस्कार

 

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत इंग्लंडतर्फे सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला.  अँडरसन हा इंग्लंडतर्फे सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरला असून त्याला इंग्लंडची महाराणी द्वितीय यांच्याकडून दिला जाणारा  ‘ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराणी एलिझाबेथ यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार अँडरसनला देण्यात येणार आहे. अँडरसनने इंग्लंडतर्फे सर्वाधिक 400 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.  अशी कामगिरी करणारा तो पहिला इंग्लिश खेळाडू ठरला आहे. 32 वर्षीय अँडरसनने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत इयान बोथम (383) यांचा विक्रम मोडीत काढला होता. जागतिक क्रिकेटमध्ये कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱयांच्या यादीत त्याचा 12 वा क्रमांक आहे.