Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

चंद्रावर भूकंप होतात काय

 

आजवरच्या भूकंपाने पृथ्वी तलावर घडलेल्या विध्वंसाने प्रचंड जीवित हानीसोबत वित्तीयहानी झाल्याच्या खुणा आजही दिसतात. अलीकडेच नेपाळमधील विध्वंसक भूकंपाने अवघे जग हादरले होते. यात जवळपास १० हजारांहून लोक मृत्युमुखी पडले. एवढेच नाही तर नेपाळचा नकाशाही काहीसा बदलला. जगाच्या पाठीवर कोठे ना कोठे भूकंप होत असतात. पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रावरही भूकंप होतात काय? या सवालावर भारताच्या चंद्रयान-१ मार्फत मिळालेल्या डाटाच्या आधारे उत्तर मिळाले असून चंद्राच्या पृष्ठभागात वेगवान हालचाली होत असल्याचा निष्कर्ष हाती आला आहे.

टेक्टोनिक प्लेटस्च्या (भूसांरचनिक स्तर) आपसातील घर्षणामुळे भूकंपासारखी आपत्ती कोसळते, असे जवाहर नेहरू विद्यापीठातील भू-शास्त्र, दूरसंवेदी व अंतराळशास्त्र विभागाचे संयोजक प्रो. सौमित्र मुखर्जी यांनी म्हटले आहे.

‘चंद्रयान-१’ वरून मिळालेल्या डाटाचे विश्लेषण केले असता त्यात आढळले की, टेक्टोनिक प्लेटस्च्या आपसातील घर्षणामुळे भूकंपासारखी आपत्ती कोसळते. चंद्रयानातील अरुंद कोनी कॅमेरा व चंद्रावरील हालचाली टिपणाऱ्या कक्षीय कॅमेऱ्यातून घेण्यात आलेल्या छायाचित्रांतून चंद्रावरही भूकंपासारख्या घटना घडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या माहितीचे शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करण्याकामी त्यांना प्रियदर्शनी सिंह यांनीही सहकार्य केले असून, यासंबंधीचे अनेक लेख आंतरराष्ट्रीयस्तरीय विज्ञानविषयक नियतकालिकात प्रकाशितही झाले आहेत.