Whats new

फिफा अध्यक्षपदी कायम राहणार ब्लेटर

 

भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपांच्या घेऱ्यात अडकल्याने जागतिक पातळीवर टीकेची झोड उठणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) हंगामी अध्यक्ष सॅप ब्लेटर आपल्या पदावर कायम राहणार आहेत. ब्रिटिश संसदेच्या दबावानंतरही पद न सोडणारे ब्लेटर यांनी अध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिला होता; परंतु उत्तराधिकारी न मिळाल्याने ते या पदावर कायम राहणार आहेत. त्यांना आफ्रिका आणि आशियाई फुटबॉल महासंघाचे समर्थन मिळेल, असा विश्वास आहे. ब्लेटर यांचा उत्तराधिकारी निवडण्याच्या उद्देशाने डिसेंबरमध्ये ज्युरिच येथे विशेष कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत निवडणुकीची तारीखही निश्चित केली जाईल.