Whats new

सानिया मिर्झा हॅथवेची ब्रँड अँम्बेसेडर

 

केबल आणि ब्रॉडबँड, हॅथवे यांनी डॉक्सिस ३.० नेटवर्क सादर करत ब्रँड अँम्बेसेडरपदी टेनिसपटू सानिया मिर्झा हिची नियुक्ती केली आहे. ज्याची ५०एमबीपीएस अल्ट्रा हाय स्पीड कनेक्टिव्हिटी आहे. यासंबंधी हॅथवेचे एम.डी. आणि सीईओ जगदीश कुमार म्हणाले, हॅथवेच्या ब्रँड अँम्बेसेडरपदी सानिया मिर्झाची नियुक्ती आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हॅथवेचे अध्यक्ष राजन गुप्ता म्हणाले, डिजिटल बदल फक्त आजच्या पिढीसाठी नसून हा बदल जुनी पिढीदेखील आत्मसात करत आहे. ते पुढे म्हणाले, आज इंटरनेटमध्ये उपयुक्तता, कार्यक्षमता, मजा, मनोरंजन, ज्ञान आणि बरेच काही आहे की हे एक घरगुती उत्पादन बनले आहे.