Whats new

जगातील सर्वांत वयोवृद्ध नवविवाहित दाम्पत्य

 

ब्रिटनमध्ये १०३ वर्षांचा नवरा आणि ९१ वर्षांची नवरी विवाहबद्ध झाले असून, ते जगातील सर्वांत वयोवृद्ध नवविवाहित दाम्पत्य ठरले आहे. जॉर्ज किर्बी व डोरीन लुकी अशी पती-पत्नीची नावे आहेत. लग्नानंतर पतीला पत्नीने व्हीलचेअरवरून नेले. दोघांचे वय एकत्र केल्यास ते १९४ वर्षे होते.

जॉर्ज किर्बी यांचा १३ जूनला १०३ वा वाढदिवस होता. त्यानिमित्त इस्टबर्न येथील एका हॉटेलमध्ये या दोघांनी विवाह केला. या समारंभास कुटुंबातील सदस्य व मित्र असे ५० जण उपस्थित होते. गिनीज बुक रेकॉर्डसचा प्रतिनिधी विवाहाचा साक्षीदार म्हणून उपस्थित होता.