Whats new

पुढील चार वर्षांत युरियाचे दर स्थिर

 

संकटांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या शेतकर्‍यांना केंद्र सरकारने दिलासा दिला असून पुढील चार वर्षात युरियाचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी याबाबतची घोषणा केल्याची माहिती राज्याचे कृषी आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. दरम्यान, शेतमालाच्या मापात घोटाळा करणार्‍या व्यापार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही खडसे यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पुढील चार वर्षात युरियाच्या एका पिशवीचे दर १७८ ते १८0 रुपयेच राहणार आहेत. याशिवाय मिश्र खतांच्या किमतीदेखील पुढील पाच वर्षे स्थिर राहाव्या म्हणून त्यावर दिली जाणारी सबसिडी कमी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे खडसे यांनी सांगितले. शेतमालाच्या मापात घोटाळा करणार्‍या व्यापार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही खडसे यांनी या वेळी दिला.