Whats new

अबकारी शुल्क नोंदणीसाठी पॅन कार्ड अनिवार्य

पॅन कार्ड अनिवार्यअबकारी शुल्क नोंदणीसाठी

खाजगी कंपन्यांकडून करण्यात येणार्‍या केंद्रीय अबकारी शुल्क नोंदणीसाठी आता पॅन कार्ड नंबर (पॅन) अनिवार्य करण्यात आला आहे. म्हणजेच ज्या कंपन्यांकडे पॅन क्रमांक नसेल त्या केंद्रीय अबकारी शुल्क नोंदणी करू शकणार नाहीत.

निर्मिती उद्योग क्षेत्रात व्यवसाय करणे सोपे व्हावे यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नोंदणी पद्धती अधिक सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ऑनलाइन अर्ज केल्यानंतर दोन दिवसांच्या आत नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे आणि ही नोंदणी करण्यासाठीच्या अर्जावर कंपनीच्या मालकाचा पॅन क्रमांक नोंदणे बंधनकारक करण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाच्या नव्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारी विभागांना मात्र ऑनलाइन अर्ज करताना पॅनक्रमांक नोंदण्याच्या नियमातून सूट देण्यात येणार आहे; पण सरकारी कंपन्या वगळता इतर कंपन्यांसाठी मात्र पॅन क्रमांक नोंदणे अपरिहार्य करण्यात आले आहे. अबकारी शुल्क नोंदणीसाठी (सेंट्रल एक्साईज रजिस्ट्रेशन) अर्ज करणार्‍या अर्जदारांनी पॅन क्रमांकासोबतच स्वत:चा ई-मेल पत्ता आणि मोबाइल नंबर नोंदणेदेखील आवश्यक करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने या नोंदणीसाठी अर्ज करण्यास कमी कालावधी लागेल आणि दोन दिवसांत नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) देखील देण्यात येईल. अशा प्रकारे पूर्णपणे भरण्यात आलेला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. यानंतर कामकाजाच्या दोन दिवसांत नोंदणी क्रमांक जारी करण्यात येईल. यासाठी दस्तावेजांची तपासणी केली जाणार नाही. ही संपूर्ण प्रक्रिया विश्‍वसनीयतेवर करण्यात येणार आहे. देशात उत्पादित होणार्‍या उत्पादनांवर आकारण्यात येणारे केंद्रीय अबकारी शुल्क (सेंट्रल एक्साईज ड्यूटी) भरण्यासाठी सेंट्रल एक्साईज रजिस्ट्रेशन या नोंदणी क्रमांकाची गरज असते.

< < Prev Next >>