Whats new

स्टुटगार्ट स्पर्धेत नादाल विजेता

 

ग्रासकोर्टवरील स्टुटगार्ट एटीपी मर्सिडीस चषक टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नादालने एकेरीचे विजेतेपद मिळविले. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत नादालचे ग्रासकोर्टवरील हे पहिले विजेतेपद आहे.

 

अंतिम सामन्यात स्पेनच्या अग्रमानांकित नादालने सर्बियाच्या  ट्रोस्कीचे आव्हान 7-6 (7-3), 6-3 असे संपुष्टात आणले. नादालने यापूर्वी म्हणजे 2010 साली विम्बल्डन ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. नादालच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हा 66 वा विजय आहे.