Whats new

केंद्राकडून 'मोबाईल ब्लड बॅंक' ऍप कार्यान्वित

 

केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय रक्तदान दिनानिमित्त ‘मोबाईल ब्लड बॅंक’ ऍप ची सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. 
‘मोबाईल ब्लड बॅंक’ ऍपमुळे जवळ असलेल्या ब्लड बॅंकेची माहिती मिळण्यास सोपे जाणार आहे. राष्ट्रीय रक्त संक्रमन परिषदेनी परवानाधारक असलेल्या  2760 ब्लड बॅंकांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. ब्लड बॅंकांची माहिती राष्ट्रीय आरोग्य पोर्टलवर उपलब्ध आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिली. 
राजधानीमधील 76 तर देशभरात 524 ब्लॅड बॅंकांची माहिती हाती आली असून, लवकरच ती अपलोड केली जाणार आहे. शिवाय, ‘थॅंक यू फॉर सेव्हिंग माय लाइफ’ असे स्लोगनला नाव देण्यात आले आहे.