Whats new

थुंकाल तर याद राखा, आर्थिक दंडासह सामाजिक सेवाही अनिवार्य

 

राज्यभरातील थुंकसंप्रदायी लोकांना आळा घालण्यासाठी सरकारने आता कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाने थुंकीविरोधात कायदा बनवण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. या कायद्यामध्ये जादा शिक्षेची तरतूद करावी असा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. शिवाय थुंकणाऱ्या व्यक्तींच्या माहितीचं संकलन करण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार केलं जात असून, लवकरच हा कायदा अस्तित्त्वात येईल.

काय आहे शिक्षा?

पहिल्यांदा थुंकताना व्यक्ती सापडली तर एक हजार रुपयांचा दंड आणि एक दिवस स्वच्छतेबाबत सामाजिक सेवा करावी लागणार.

दुसऱ्यांदा तिच व्यक्ती थुंकताना सापडली तर 3 हजार रुपयांचा दंड आणि 3 दिवस सामाजिक सेवा करावी लागणार. तिसऱ्यांदा व्यक्ती थुंकताना सापडली तर 5 हजार रुपये आणि 5 दिवस सामाजिक सेवा करावी लागणार.