Whats new

सहयोगी महाधिवक्तापदी रोहित देव यांची नियुक्ती

 

नागपूर येथील प्रख्यात विधिज्ञ आणि असिस्टंट सॉलिसिटर जनरल रोहित देव यांची राज्याच्या सहयोगी महाधिवक्तापदी नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

माजी महाअधिवक्ता सुनील मनोहर यांच्याकडेच यापूर्वी सहयोगी महाअधिवक्ता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र मनोहर यांनी वैयिक्तक कारणास्तव राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी अ‍ॅड. अनिल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. रोहित देव यांना सहयोगी महाधिवक्तापदी नेमण्यात आले.