Whats new

जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार चार्लस कोरिया

भारतातील वैशिष्ट्यपूर्ण वास्तुंची निर्मिती करणारे वास्तुरचनाकार चार्लस कोरिया ख्यातनाम वास्तुरचनाकार अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना 1972 साली पद्श्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. तर 2006 साली त्यांना पद्विभूषणने गौरविण्यात आलं होतं. तसेच वास्तुरचना क्षेत्रात केलेल्या कामासाठी कोरिया यांना अनेक आंतराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. त्यांचा जन्म 1 सप्टेंबर 1930 रोजी सिंकदराबादमध्ये झाला होता. त्यांनी मुबंईतील झेवियर्स महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.

चार्लस कोरिया यांच्या निधनानंतर पीएमओने देखील ट्वीटरवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

नवी मुंबईचे वास्तुरचनाकार...

नवी मुंबई शहराची उभारणी करताना चार्लस कोरिया यांची 1970 साली प्रमुख वास्तुरचनाकार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आपल्या डिझाइनमध्ये 'ओपन टू स्काय' पॅर्टनला प्राधान्य देऊन स्थानिक तंत्राचा वापर करणं पसंत केलं होतं. नवी मुंबई, बेलापूर येथे त्यांनी आर्टिस्ट व्हिलेज कलाग्राम डिझाइन केलं होतं. 

मात्र आता होणाऱ्या शहरांच्या वाढीवर ते कायम टीका करीत असे. ज्यापद्धतीने शहरीकरण होत होते त्याबाबत त्यांनी बऱ्याचदा नाराजी व्यक्त केली होती.   

भारतातीलही अनेक वास्तुंची रचना चार्लस यांनी केली...

साबरमती इथला गांधी आश्रम, भोपाळच्या भारत भवनची इमारत, गोव्यातल्या कला अकादमीची इमारत अशा अनेक प्रसिद्ध इमारतींची संकल्पना कोरिया यांची होती. तसेच दिल्ली, मुंबई अहमदाबाद आणि बंगळुरु येथील टाऊनशीपचेही त्यांनी डिझाइन केले होते. नुकत्याच त्यांनी परदेशातल्या काही प्रसिद्ध इमारतीही डिझाईन केल्या होत्या.

चार्लस यांनी रचना केलेल्या कांचनजुगा ही इमारत वास्तुकलेचा उत्तम नमुना:

मुंबईमधील पेडर रोडवरील कांचनजुगा ही इमारत वास्तुकलेचा उत्तम नमुना मानली जाते. त्याची रचना देखील चार्लस यांनीच केली होती.