Whats new

मुंबई क्रिकेटवरील पवारांचे वर्चस्व अबाधित

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि प्रतिष्ठेचे बनलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत अखेर शरद पवार यांनीच बाजी मारली. १७६ मतांसह विजयी होत पवार सातव्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले. पवारांनी क्रिकेट फर्स्ट पॅनलचे उमेदवार डॉ. विजय पाटील यांचा ३४ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत पवार - म्हाडदळकर गटाने १७ पैकी १५ जागांवर विजय मिळवून एमसीएचे मैदानही जिंकले.