Whats new

सौरशक्तीद्वारे 1 लाख मेगावॅट उर्जानिर्मितीचे ध्येय

देशाला भेडसावणारी विजेची समस्या कमी करण्यासाठी सौरउर्जेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. सौरशक्तीच्या माध्यमातून येत्या 2022 पर्यंत 1 लाख मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली.

या निर्णयामुळे भारत सर्वाधिक सौरउर्जा निर्माण करणारा देश ठरणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आव्हान मोठे आहे. परंतु ते पार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सोलर प्रोजेक्टस, ग्रीड कनेक्टीव्हीटी, रूफ टॉप सोलर पॉवर अशा माध्यमातून हे आव्हान पेलण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 6 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. 2022 पर्यंत हे सर्व प्रकल्प कार्यान्वित करण्याचा सरकारचा इरादा आहे. केंद्र सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15 हजार 50 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचे ठरवले आहे. उर्जा आणि पुनःनिर्माण मंत्रालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे. 19200 मेगावॅट क्षमतेचे तीन प्रकल्प उभारले जात आहेत.