Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

अमेनेस्टीच्या प्रमुखपदी आकार पटेल

 

 

मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या अमेनेस्टी इंटरनॅशनल या संस्थेच्या भारतातील प्रमुखपदी लेखक आणि पत्रकार आकार पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पटेल यांनी वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. डेक्कन क्रोनिकल या दैनिकात त्यांनी सहाय्यक संपादक म्हणून काम केले होते. तसेच मिड-डेचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

पटेल अमेनेस्टी इंटरनॅशनलमध्ये दाखल होत आहेत, असे मिनार पिंपल यांनी सांगितले. एमनेस्टीचे भारतात तीन मुख्य कार्यालये आहेत. भारतासारख्या जागतिक पातळीवर प्रभावशाली ठरणाऱ्या देशातील मानवधिकारासाठीचा संघर्ष अद्याप सुरुच आहे.

अमेनेस्टी इंटरनॅशल मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी ही संस्था जगभर कार्य करते. १९६१ मध्ये लंडनमधील बॅरीस्टर पिटर बेनेसन यांनी स्थापन केली होती. स्वतंत्र्यासाठी पोर्तुगालमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. या घटनेनंतर ही संस्था स्थापन करण्यात आली.