Whats new

‘मुंबई’ देशातील सर्वाधिक महागडे शहर

 

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे ‘मुंबई’ शहर आता देशातील सर्वात महागडे शहर बनले आहे. ‘मर्सर’च्या ‘कॉस्ट ऑफ लिविंग’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये अंगोलाची राजधानी असणारे ‘लुआंडा’ हे सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वाधिक महागडे शहर ठरले आहे. तर मुंबईचा यात 74 वा क्रमांक लागतो. 

या सर्वेक्षणानुसार, भारतातील सर्वाधिक लोकसंख्या मुंबईत आहे. मुंबईनंतर दिल्ली (132), चेन्नई (157), बंगळूर (183) आणि कोलकत्ता (193) यांचा नंबर लागतो.

सर्वोत्तम जागा, घर, वाहतूक, अन्न, कपडे आणि मनोरंजन या सुविधांच्या आधारावर जगभरातील एकूण 207 शहरांचा सर्वे करण्यात आला होता. पहिल्या 10 महागडय़ा शहरांमध्ये आशियाई शहरांचे वर्चस्व असल्याचे या सर्वेमधून स्पष्ट झाले आहे. यात लुआंडानंतर हाँगकाँग(2), ज्युरिच(3), सिंगापूर(4), जेनेव्हा(5), शांघाई(6), बिजींग(7), सिओल(8), बर्न(9) आणि जमेना(10) या शहरांचा समावेश आहे.

‘मर्सर’ने जगातील सर्वाधिक स्वस्त असणाऱ्या 10 शहरांची देखील यादी जाहीर केली आहे. यात बिस्केक(कर्गिस्तान), विन्टहुक(नामीबिया), कराची(पाकिस्तान), टय़ूनिस(टय़ूनीशिया), स्कॉपयो(मकदूनिया), बंजूल(गामबिया), मिंस्क(बेलारूस), केप टाउन(साऊथ आफ्रिका), मॅनागुआ(निकारगुआ) आणि त्बिलिसी (निकारगुआ) या शहरांचा समावेश आहे.