Whats new

चीनमध्येही अवतरली गीता

 

भारतातील प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ भगवदगीता चीनमध्येही अवतरली आहे. चीनमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय योग संमेलनात चीनी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले.

शांघाई येथील झोजियांग विद्यापीठाचे प्राध्यापक वांग झू चंग यांनी अनुवादीत केलेल्या व सिचुआन पिपल्स पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या भगवदगीतेच्या चिनी भाषेतील ग्रंथाचे चीनमधील भारतातील राजदूत अशोक कांत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गुआंगझू येथील भारतीय वाणिज्य दुतावासाचे महावाणिज्यदूत असलेल्या के. नागराज नायडू यांनी या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आहे. दक्षिण पश्चिम सिचुआन प्रांतातील दुजिआंग्यन शहरात पार पडलेल्या कार्यक्रमास भारतातील प्रसिद्ध योग शिक्षकांनी हजेरी लावली होती.