Whats new

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी दिवाकर रावते

 

राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात त्यांनी हा कार्यभार स्वीकारला. या वेळी खासदार अरविंद सावंत, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव गौतम चॅटर्जी, महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे उपस्थित होते. एसटीची प्रवासी संख्या वाढवणे, कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकबाकी देणे, शिवनेरीमध्ये महिलांसाठी दहा आसने राखीव, निमआराम गाड्यांमध्ये चांगली आसने, अवैध वाहतुकीला रोखणार अशा विविध घोषणा त्यांनी या वेळी केल्या. एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारणारे ते पहिलेच मंत्री ठरले आहेत.