Whats new

सर्बियाला पहिले विश्वविजेतेपद

 

नेमांजा मॅक्सिमोव्हिकने अतिरिक्त वेळातील खेळात ११८वा गोल साकारला आणि सर्बियाने बलाढय़ ब्राझीलला हरवून २० वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे विजेतेपद पटकावले.

स्टानिसा मँडिकने ७०व्या मिनिटाला गोल साकारून स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आलेल्या सर्बियाच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या आशा निर्माण केल्या. ब्राझीलने पहिल्या सत्रावर वर्चस्व प्रस्थापित केले. जीन कार्लोस आणि गॅब्रिएल यांनी गोल साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण सर्बियाचा कर्णधार प्र्रेडॅग राजकोव्हिकने ते वाचवले. अतिरिक्त वेळात सर्बियाचा मध्यरक्षक सर्गेज मिलानकोव्हिकने दुसऱ्याच मिनिटाला हेडरद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र जीनने तो हाणून पाडला.