Whats new

मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु संजय देशमुख

 

मुंबई विद्यापीठाच्या जीवविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय देशमुख हे मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू असतील. राज्यपाल तथा कुलपती सी.विद्यासागर राव यांनी देशमुख यांची नियुक्ती केली.

मावळते कुलगुरू डॉ.राजन वेळूकर ६ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु नियुक्त करण्यासाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती नेमली होती. या समितीने शनिवारी सकाळी कुलगुरुपदासाठी पात्र वाटलेल्या नावांचे पॅनेल राज्यपालांकडे सादर केले. त्यांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ.देशमुख यांची नियुक्ती केली. त्यांचा कार्यकाळ ७ जुलैपासून पाच वर्षांसाठी असेल.

१ मे १९६५ रोजी जन्मलेले डॉ.देशमुख यांनी मुंबई विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट आफ सायन्समधून १९८६ मध्ये एमएस्सी पदवी संपादन केली. १९९० मध्ये त्यांनी वनस्पतीशास्त्रात पीएचडी संपादन केली. १९९० ते ९५ या काळात ते चेन्नईच्या एम.एस.स्वामिनाथन संशोधन केंद्रात वैज्ञानिक कोस्टल सिस्टिम रिसर्च प्रोग्रामचे प्रमुख होते.