Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

केंद्र सरकारद्वारे संचालित शाळांमध्ये अभ्यासक्रमात योगा विषय सक्तीचा

 

केंद्र सरकारद्वारे संचालित शाळांमध्ये इयत्ता ६वी ते १०वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात आता योग विषयाचा समावेश होणार आहे. या विषयाअंतर्गत सरतेशेवटी १०० गुणांची परीक्षा घेतली जाईल. प्रात्यक्षिकाअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध आसने करावी लागतील. अर्थात हा विषय कोणत्या शैक्षणिक सत्रापासून समाविष्ट केला जाईल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

देशातील सर्व केंद्रीय विद्यालये आणि जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये इयत्ता ६वी ते १०वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात योग विषय समाविष्ट केला जाईल. अर्थात या विषयाचा विद्यार्थ्यांवर कुठलाही अतिरिक्त ताण पडणार नाही. कारण या विषयाअंतर्गत ८० गुण प्रात्यक्षिकासाठी आणि केवळ २० गुण लेखी परीक्षेसाठी असतील. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातही योग विषयाचा समावेश करण्यात येईल.