Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

हिट अँड रन प्रकरणी सलमानला ५ वर्षांची शिक्षा

 
बहुचर्चित व गेली तेरा वर्षे चाललेल्या हिट अँड रन खटल्यात सलमान खानला दोषी ठरवण्यात आले असून त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सलमानला आज कोर्टातूनच तुरूंगात नेण्यात येणार असून सुरक्षेच्या कारणास्तव त्याला आर्थर रोड तुरूंगाऐवजी तळोजा किंवा ठाणे येथील कारगृहात हलवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास न्यायाधीशांनी सलमानला दोषी ठरवले. अपघातावेळी सलमान मद्यप्राशन करून गाडी चालवत होता, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हते असे सांगत कोर्टाने त्याला दोषी ठरवले. तुझ्यावरील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत, तुझे काय म्हणणे आहे असा प्रश्न न्यायाधीशांनी सलमानला विचारला असता त्याने काही उत्तर न देता आपले वकील शिवदे यांच्याकडे पाहिले आणि त्यानंतर शिवदे यांनी युक्तिवाद सुरू केला.
सलमानच्या डोळ्यात तरळले अश्रू
सलमान बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात पोचला तेव्हा रिलॅक्स मूडमध्ये होता मात्र  न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर तो घामाघूम झाला, त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तर निकाल ऐकून त्याच्या कुटुंबियांची घोर निराशा झाली, त्याच्या आईची तब्येतही बिघडल्याचे समजते. अलविरा, अर्पिता या त्याच्या बहिणींना अश्रू अनावर झाले.  
२८ सप्टेंबर २००२ हिट अंड रन प्रकरण घडले. सलमानने लँड कु्रझर गाडी भरधाव चालवत वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळील फुटपाथवर चढवली. पदपथावर झोपलेले पाच जण गाडीखाली चिरडले गेले. यातील एकाचा बळी गेला. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. मात्र २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला.