Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

ओबेल पुरस्कार 2015


 

यंदाचा ओबेल पुरस्कार अमेरिकेचे श्रेष्ठ गणितज्ज्ञ जॉन नॅश आणि कॅनडाचे लुईस निरेनबर्ग यांना जाहीर झाला आहे. महान गणिती नील्स हेन्रिक आबेल यांच्या स्मरणार्थ देण्यात येणा-या या पुरस्काराचा दर्जा ‘नोबेल’इतकाच उच्च आहे.

गणितज्ज्ञ मंडळी इतकी तल्लख बुद्धीची असतात. त्यांचं उत्तर नेमकं, नेटकं आणि अचूक असतं. सर्व शास्त्रांच्या प्रगतीमध्ये गणिताचा भक्कम आधारस्तंभ असल्याचे दिसून आलंय. तरीही आल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या इच्छापत्रात नोबेल पुरस्कारासाठी गणिताची निवड केलेली नाही. ही कसर ‘नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स’ या संस्थेने भरून काढली आहे. महान गणिती नील्स हेन्रिक आबेल (१८०२-१८२९) यांच्या स्मरणार्थ त्यांनी २००३ पासून आबेल पारितोषिक प्रदान करायला सुरवात केली. केवळ २७ वर्षांचे आयुष्य मिळालेल्या आबेल यांच्याबद्दल नॉर्वेमध्ये नितांत आदर आहे. आबेल पुरस्काराचा दर्जाही ‘नोबेल’इतकाच उच्च आहे. यंदाचा आबेल पुरस्कार अमेरिकेचे श्रेष्ठ गणितज्ज्ञ जॉन नॅश आणि कॅनडाचे लुईस निरेनबर्ग यांना विज्ञानात हरघडीला उपयोगी पडणा-या ‘पार्शल डिफरन्शियल इक्वेशन’च्या सखोल संशोधनाबद्दल जाहीर झालाय. आबेल पारितोषिक हे साधारणत: ऐंशी-नव्वदच्या जवळ आलेल्या गणितींनाच मिळतंय. याला अपवाद म्हणजे २००७ चे ‘आबेल’ मानकरी प्रो. एस. आर. श्रीनिवास वर्धन. ते त्यावर्षी ६७ वर्षांचे होते! जॉन नॅश यांचे व्यक्तिमत्व मात्र विलक्षण आहे. त्यांना अर्थशास्त्रामधील नोबेल मेमोरियल अवॉर्ड १९९४ मध्ये मिळाले होते. 

< < Prev Next >>