Whats new

अमेरिकेची पाकला विमानांची रसद

अमेरिकेने पाकिस्तानला १४ लढाऊ विमाने, ५९ लष्करी प्रशिक्षण जेट्स आणि ३७४ सैन्यवाहक विमानांची रसद दिल्याने पाकिस्तानचे हवाई बळ वाढले आहे. अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अमेरिकी फौजांनी ही विमाने वापरली होती.

अफगाणिस्तानमधून अमेरिकी आणि मित्र फौजा माघारी परतल्याने अमेरिकेने अतिरिक्त संरक्षण साहित्य श्रेणीतहत पाकिस्तानला ही विमाने दिली आहेत. अशा प्रकारची पाकिस्तानला मदत देण्यास भारताने विरोध करूनही अमेरिकेने पाकिस्तानला ही रसद दिली आहे. अमेरिकेने ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर आजतागायत पाकिस्तानला ५.४ अब्ज डॉलरच्या एफ-१६ लढाऊ विमानांसह लष्करी हार्डवेअर सामग्री दिली आहे.

< < Prev Next >>