Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

आयडीबीआय, पीएनबीकडून गृहककर्जदरात कपात


 

आयडीबीआय आणि पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) गृहकर्जाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही बँकांनी दरामध्ये 0.25 टक्के कपात केली आहे.

आयडीबीआय बँकेने किमान कर्जदर (बेस लेंडिंग रेट) 0.25 टक्‍क्‍यांनी कमी करून 10 टक्के इतका केला आहे. त्यामुळे आयडीबीआय बँकेच्या गृहकर्जाचा मासिक हप्ता कमी होणार आहे. हे दर 11 मे पासून लागू करण्यात येणार आहेत. पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) देखील गृहकर्जाच्या दरात कपात केली आहे. बॅंकेने किमान कर्जदर (बेस लेंडिंग रेट) 0.25 टक्‍क्‍यांनी कमी करून 10 टक्के इतका केला आहे. बँक ऑफ बडोदानेही गृहकर्जाच्या दरात कपात केली आहे. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि ऍक्‍सिस बँक यांनीही आपल्या गृहकर्जाच्या दरात कपात केली आहे. देशातील प्रमुख बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य गृहकर्जदारांच्या कर्जाचा मासिक हप्ता कमी होऊन दिलासा मिळणार आहे. इतरही काही बॅंका आगामी काळात व्याजदरांत कपात करण्याची शक्‍यता आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरांत दोनवेळा कपात केल्यानंतरही बँका त्यांच्या ग्राहकांना फायदा देत नसल्याबद्दल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नाराजी व्यक्त केली होती.

< < Prev Next >>