Whats new

आयएनएस सरदार पटेल' लवकरच कार्यान्वित

 

देशाचा पश्‍चिम किनारा अधिक सुरक्षित करण्यासाठी अत्याधुनिक आयएनएस सरदार पटेल हा नौदल तळ कार्यान्वित होण्याची शक्‍यता आहे. पोरबंदर येथे ही संस्था असेल. गुजरातचा किनारा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बनला असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही संस्था कार्यान्वित होणार आहे.

गेल्या काही काळात गुजरातच्या किनाऱ्यावर सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा अनेकदा प्रयत्न झाला होता. त्यामुळे नौदलाला अत्याधुनिक सुविधा असलेल्या केंद्राची आवश्‍यकता होती, असे नौदलातर्फे सांगण्यात आले. आयएनएस सरदार पटेलमुळे नौदलाच्या क्षमतेत वाढ झाली असल्याचे नौदलाचे म्हणणे आहे. गुजरातला 880 नॉटिकल मैलांचा किनारा लाभला असून 532 किलोमीटरची भूसीमा पाकिस्तानला जोडली गेली आहे, त्यामुळे हा भाग सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांत गुजरातच्या किना-यावर नौदलाने संरक्षणाचे अनेक उपाय करत नव्या संस्थांची उभारणी केली आहे. या किना-यावर अनेक बंदरे असून दरवर्षी 30 कोटी टनांची माल वाहतूक होत असते. ही उलाढाल देशातील सर्व बंदरांवर होणा-या एकूण वाहतुकीच्या 30 टक्के आहे, शिवाय 71 टक्के कच्च्या तेलाची आयात याच किना-यावर आणली जाते, त्यामुळेच शांततेच्या काळातही या किना-याला अत्यंत महत्त्व असते.

< < Prev Next >>