Whats new

गीता फोगटला फ्रीस्टाईलमध्ये कांस्य

 

दोहा येथे सुरू असलेल्या आशियाई वरिष्ठ कुस्ती चॅम्पियनशीपमधील महिला गटात भारताच्या गीता फोगटने ५८ किलो फ्रीस्टाईल गटात कांस्यपदकाची कमाई केली. पुरुषांमध्ये भारताच्या हितेन्दर बेनीवालला १२५ किलो गटात पराभवाचा सामना करावा लागला. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवत पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनण्याचा मान मिळविणा-या गीताने व्हिएतनामच्या थी लोन नगुएनला पराभूत करत कांस्यपदक पटकावले.

< < Prev Next >>